सलाम ! मुंबई पोलीस कर्मचाऱ्याने असे वाचवले 14 वर्षीय मुलीचे प्राण

कोरोना महामारी संकटाच्या काळात पोलीस कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. कामगारांना घरी पोहचवण्यापासून ते लोकांसाठी जेवणाची सोय करेपर्यंत पोलीस कर्मचारी धावून येत आहेत. आता मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने एका 14 वर्षीय मुलीचे प्राण वाचवून एक उदाहरण समोर ठेवले आहे.

14 वर्षीय सना फातिमा खान मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये भरती होती. तिची ओपन हार्ट सर्जरी होणार असल्याने रक्ताची त्वरित आवश्यकता होती. तिला ए पॉजिटिव्ह रक्ताची गरज होती. मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे मुलीच्या कुटुंबातील कोणतीही वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहचू शकले नाही. अशा स्थितीत ऑनड्युटी असलेले मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेंबल आकाश गायकवाड यांनी रक्तदान करून माणुसकी जपली.

सनाचे ऑपरेशन यशस्वी झाले असून, आता ती व्यवस्थित आहे. सोशल मीडियावर या पोलीस कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतुक केले जात आहे. अभिनेता राहुल देवने देखील त्यांचे कौतुक केले.

 

Leave a Comment