लॉकडाउनच्या २ महिन्यात विराट कोहलीने घरबसल्या कमावले ३.६ कोटी


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु असल्यामुळे सध्या अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच जगभरात सर्वात आवर्जुन पाहिला जाणारा क्रिकेट हा खेळ पुन्हा एकदा सुरु करता येईल का त्याचबरोबर त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल का याची चाचपणी करत आहे. या काळात अनेक खेळाडूंना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले आहे. पण यासगळ्यात तिन्ही प्रकारच्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने लॉकडाऊनच्या काळात घर बसल्या ३ कोटींपेक्षा जास्त रक्कम कमावले आहेत. नुकतीच लॉकडाउन काळात इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची नाव जाहीर करण्यात आली आहेत. विराट कोहली हा ज्यात एकमेव क्रिकेटपटू असून या यादीत त्याने सहावा क्रमांक पटकावला आहे. विराटने १२ मार्च ते १४ मे या काळात इन्स्टाग्रामवर विविध ब्रँडच्या पोस्ट टाकत ३.६ कोटी कमावले आहेत.

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो लॉकडाउन काळात इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये आघाडीवर आहे. लॉकडाउन काळात रोनाल्डोने तब्बल १७.९ कोटींची कमाई केली आहे. २२ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही रोनाल्डोच अव्वल आहे.

या काळात रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी आणि अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनल मेस्सीही कमाईमध्ये चांगलाच आघाडीवर आहे. या काळात मेस्सीने १२.३ तर ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमारने अवघ्या ४ पोस्ट करत ११ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. याव्यतिरिक्त या यादीत एनबीए स्टार शकील ओ’नील, इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम हे खेळाडूही आहेत. लॉकडाऊनच्या या काळात ३ ब्रँडच्या कोहलीने पोस्ट केल्या असून प्रत्येक पोस्टसाठी त्याने १.२ कोटी रुपये घेतले आहेत.

Leave a Comment