व्हिडीओ : ‘माझ्या गवतावरून बाजूला होता का ?’, व्यक्तीने थेट या पंतप्रधानांनाच दिला आदेश

इंटरनेटवर सध्या ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून प्रत्येकजण हैराण होत आहे. कारण व्हिडीओमध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती पंतप्रधानांशी जशाप्रकारे बोलत आहे ते बघून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही.

पंतप्रधान मॉरिसन हे एका व्यक्तीच्या लॉनवर (गवताचा भाग) उभे राहून पत्रकारांशी संवाद साधत होते. तेवढ्यात एक व्यक्ती घराच्या बाहेर येत चक्क पंतप्रधानांनाच त्या गवतावरून बाजूला हटण्यास सांगतो. व्यक्ती घराच्या बाहेर येऊन म्हणतो की, तुम्ही सर्व लोक त्या गवतावरून बाजूला होऊ शकता का ? मी आताच तेथे बियाणे टाकली आहेत.

विशेष म्हणजे त्या व्यक्तीने बाजूला सरकण्यास सांगितल्यावर पंतप्रधान मॉरिसन देखील शांतरित्या आपण सर्व येथून बाजूला जाऊया असे म्हणत तेथून बाजूला हटतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मॉरिसन हे कॅनबरा येथील गूगॉन्ग येथील एका घराबाहेर गवतावर उभे राहून मीडियाशी बोलत होते. व्यक्तीने विनंती केल्यावर मॉरिसन देखील अगदी सहज तेथून बाजूला होता. यासाठी त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Leave a Comment