चोरी झालेल्या आयफोनला असे ट्रॅक करणार अ‍ॅपल, दिली चेतावणी

कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार उफाळला आहे. तोडफोड, चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेतील अ‍ॅपल कंपनीचे स्टोर्स फोडून आयफोन चोरी करण्यात आले आहेत. मात्र आता अ‍ॅपल कंपनीने चोरी झालेले आयफोन शोधण्याचा एक मार्ग शोधला आहे.  कंपनी सहज आयफोनला ट्रॅक करत आहे. कंपनीने चोरी करणाऱ्यांना चेतावणी देखील जारी केली आहे. ज्यात त्यांना ट्रॅक केले जात असल्याचे सांगितले आहे.

Image Credited – Clipper28

अ‍ॅपल न्यूयॉर्क, लॉस एंजिल्स, मिनीपोलिस, वॉशिंग्टन आणि फिलाडेल्फिया येथील रिटेस स्टोर्समधून चोरी झालेल्या सर्व आयफोनवर एक ऑन स्क्रिन मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये लिहिले आहे की, डिव्हाईसला डिसेबल करण्यात आले असून, याला ट्रॅक केले जात आहे. स्थानिक प्रशासनाला देखील माहिती देण्यात आली आहे.

Image Credited – 9to5google

स्टोर्समधून फोन चोरी करणाऱ्या अनेकांनी फोन ब्लॉक करण्यात आल्याचे सोशल मीडियावर मान्य केले आहे. अ‍ॅपलला आयफोनमध्ये एख खास सॉफ्टवेअर देत असते. ज्याद्वारे फोन चोरी झाल्यावर डिसेबल अथवा ट्रॅक करता येतो.

Leave a Comment