फोर्ब्सने जाहीर केली सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींची यादी, एकमेव भारतीय अभिनेता या यादीत

फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 सेलिब्रेटींची यादी जाहीर केली असून, मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीच्या यादीत देखील अभिनेता अक्षय कुमारचा समावेश आहे. या यादीत समावेश असलेला अक्षय कुमार एकमेव भारतीय सेलिब्रेटी आहे. यावर्षी अक्षय कुमार 48.5 मिलियन डॉलर्स (जवळपास 366 कोटी रुपये) 52व्या स्थानावर आहे. मागील वर्षी तो 65 मिलियन डॉलर कमाईसह 33 व्या स्थानावर होता.

अक्षयने हॉलिवूड कलाकार विल स्मिथ (69),एंजेलिना जोली (99), पॉप स्टार्स रिहाना (60), कॅटी पेरी (86), लेडी गागा (87) आणि जेनिफर लोपेझ (56) यांना देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकले.

Image Credited – DNA India

2020 फोर्ब्स टॉप-100 सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये 590 मिलियन डॉलरसह कायली जेनेरने पहिले स्थान मिळवले आहे. या नंतर टॉप-10 मध्ये कॅनये वेस्ट, रोजर फेडरर, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेब्रॉन जेम्स आणि ड्वेन जॉन्सन यांचा समावेश आहे.

दरम्यान, अक्षय कुमार लवकर लक्ष्मी बॉम्ब, सुर्यवंशी, पृथ्वीराज, अतरंगी रे या चित्रपटांसह अ‍ॅमेझॉन प्राईमच्या द एन्ड या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment