दिवाळीतील मातीच्या मुर्तींवरील चीनी वर्चस्वाला आव्हान

फोटो साभार आयपीजी डॉट कॉम

यंदाच्या दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या मातीच्या गणेश गौरी मूर्ती भारतातच तयार करण्याचे आव्हान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारले आहे. यंदा बाजारात मेड इन इंडिया मूर्ती असतील असे सांगताना त्यांनी माती कला बोर्डाकडे त्याचे नेतृत्व दिले गेल्याचे समजते. भारतात दिवाळी हा मोठा सण असून दिवाळीनिमित्त घरोघरी मातीच्या गणेश आणि लक्ष्मी तसेच अन्य मूर्तींचे पूजन करण्याची प्रथा आहे. गेली काही वर्षे या मूर्ती चीन मधून येतात आणि भारतीय बाजारावर चीनी मुर्तींचेच वर्चस्व आहे.

यंदा मात्र आदित्यनाथ यांनी चीनचे हे वर्चस्व मोडून काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी या महिन्यापासून ऑनलाईन कार्यशाळा सुरु केल्या जात आहेत. इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँड डिझाईन जयपूर, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थान वर्धा, राष्ट्रीय फॅशन व तंत्रज्ञान संस्था रायबरेली व उत्तर प्रदेशातील तज्ञ यांच्याशी त्या संदर्भात बोलणी झाली आहेत.

मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा जेथे कुठे भरविल्या जातील तेथे मोठ्या स्क्रीनचे टीव्ही बसविले जाणार आहेत. मूर्तिकार मूर्ती कश्या बनवायच्या याची प्रात्यक्षिके देतील. कार्यशाळेत सोशल डीस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे पालन केले जाणार आहे. यात शिक्षण घेणाऱ्याना आवश्यक कौशल्ये शिकविली जातील आणि सुरक्षित पॅकेजिंग कसे करायचे याचेही शिक्षण दिले जाणार आहे.

Leave a Comment