ही बाईक होणार फक्त एकच व्यक्तीच्या मालकीची - Majha Paper

ही बाईक होणार फक्त एकच व्यक्तीच्या मालकीची

फोटो साभार नवभारत टाईम्स

शानदार बाईक्ससाठी प्रसिद्ध असलेल्या इटलीच्या एमव्ही अगस्ताने एक विशेष बाईक बनविली आहे. जगातील फक्त एकच व्यक्ती या बाईकची खरेदी करू शकणार आहे कारण मुळात या बाईकचे एकच युनिट बनविले गेले आहे. ही बाईक एका व्यक्तीने खरेदी केली आहे मात्र तिचे नाव उघड केले गेलेले नाही. ही बाईक कंपनीच्या ब्रुटेल १००० आरआर सुपर नेकेड बाईकची अल्ट्रा लिमिटेड एडीशन आहे. तिच्या नावात एमएल ही अक्षरे घातली गेली आहेत ती खरेदीदार व्यक्तीशी संबंधित म्हणजे त्याच्या नावाचा शॉर्टफॉर्म आहेत असे सांगितले जात आहे.

या बाईकचा लुक स्टँडर्ड ब्रुटेलप्रमाणेच आहे मात्र ती ब्ल्यू व्हाईट कॉम्बिनेशनसह ट्रायकलर पेंट स्कीम सह आहे. अल्युमिनियम व्हील्स व स्विंग आर्म गोल्डन पेंट मध्ये आहेत. बाईकच्या मेकॅनीझम मध्ये बदल केला गेलेला नाही.

बाईकला १००० आरआरचे ९९८ सीसी इंजिन सहा स्पीड ट्रान्समिशन सह दिले गेले आहे. बाईकचा टॉप स्पीड ताशी ३०० किमी असून तिला रेस, स्पोर्ट्स, रेन व कस्टम असे चार ड्रायविंग मोडस आहेत. ५ इंची हाय रेझोल्यूशन कलर टीएफटी डिस्प्ले असून या बाईकची किंमत जाहीर केली गेलेली नाही. अर्थात हे एकच मॉडेल बनविले गेल्याने तिची किंमत जास्त असणार हे उघड आहे.

Leave a Comment