शाहरुखचा बॉडीगार्ड रवी घेतो सर्वाधिक पगार

फोटो साभार नवभारत टाईम्स

बॉलीवूड सेलेब्रिटी बॉडी गार्डचे संरक्षण घेत असतातच. भाईजान सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा तर नेहमीच प्रसिद्धीत असतो. मात्र शेरा हा काही सर्वाधिक पगार घेणारा बॉडीगार्ड नाही. हा मान जातो किंग खान म्हणजे शाहरुखच्या बॉडी गार्ड रवी सिंग याच्याकडे. रवी सिंग फारसा प्रसिद्धीच्या वलयात नाही. मात्र गेली ९ वर्षे तो शाहरुखच्या सावलीप्रमाणे त्याच्या सोबत आहे आणि केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा शाहरुखची सुरक्षा सांभाळतो आहे. रवी शाहरुखच्या कुटुंबातील एक सदस्य बनला असून कुटुंबातील सर्व कार्यक्रमात त्याचा सहभाग असतो.

शाहरुखने सर्वप्रथम यासीन याची नेमणूक बॉडी गार्ड म्हणून केली होती. मात्र यासीन याने स्वतची एजन्सी सुरु केल्यावर हे काम रवी सिंग यांच्याकडे आले. शाहरुख त्याला वर्षाला २ कोटी ७० लाख रुपये पगार देतो. वास्तविक शेरा सर्वाधिक पगार घेणारा बॉडीगार्ड म्हणून ओळखला जातो मात्र सलमान खान त्याला दोन कोटीच्या आसपास पगार देतो आणि शेराची स्वतःची सुरक्षा एजन्सी आहे.

Leave a Comment