मारुती सुझुकीने करोना बचावासाठी सुरु केली विविध वस्तूंची विक्री

फोटो साभार टाईम्स नाऊ

मारुती सुझुकीने करोना साथ लक्षात घेऊन आपल्या ग्राहकांना कार मध्ये सुरक्षित राहता यावे यासाठी विविध वस्तूंची विक्री सुरु केली आहे. त्यात ग्राहकांना ड्रायविंग करताना वापरता येतील अश्या अनेक वस्तू असून थ्री प्लाय मास्क, ग्लोव्हज, आय गिअर्स, कार पार्टीशन, शु कव्हर्स अश्या १४ वस्तूंचा समावेश आहे. त्यांच्या किमती १० रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंत असून या वस्तू कंपनीच्या शो रूम मध्ये तसेच ऑफिशियल वेबसाईटवर ग्राहक खरेदी करू शकणार आहेत.

शुकव्हर आणि आय गियर्स तसेच फेस वायर्स डिस्पोजेबल आहेत. फेस मास्क १० रुपये, ग्लोव्हज २० रुपये, शु कव्हर्स २१ रुपये, फेस वायर्स ५५ रुपये, आय गिअर्स १०० रुपये तर कार पार्टीशन ५४९ ते ६४९ रुपये अश्या किमतीत आहेत. कार पार्टीशन पीव्हीसीचे असून ते सहज लावता येणार आहे. यामुळे गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकमेकांपासून दूर राहणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व वस्तूंचा वापर प्रवासात करोना पासून बचाव करण्यासाठी होणार आहे.

Leave a Comment