पृथ्वीच्या दिशेने येत आहे अस्मानी संकट

फोटो साभार माशाबाल

यंदाचे म्हणजे २०२० हे वर्ष करोना, चक्रीवादळे, भूकंप या सारख्या संकटांची मालिका घेऊन आले असून त्यामुळे जगभरातील नागरिकांच्या आयुष्यावर प्रभाव पडला आहे. त्यातच भर म्हणून आता पृथ्वीवर अस्मानी संकट येऊ घातले आहे. ग्लोबल न्यूजच्या बातमी प्रमाणे नासाच्या सेंटर फॉर नियर अर्थ ओब्जेक्ट स्टडीजच्या अहवालानुसार अनेक उल्कापिंड या काळात पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहेत.

उद्या म्हणजे ६ जून रोजी उल्कापिंड १६३३४८ (२००२ एनएनजी) अतिशय वेगाने सूर्याच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत ३ वा.२० मिनिटांनी प्रवेश करत आहे. त्याची लांबी २५० मीटर तर रुंदी १३५ मीटर आहे. अर्थात त्याच्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. तो वेगाने पृथ्वीच्या जवळून निघून जाईल.

दुसरी उल्का एक्सए २२ ही ८ जून रोजी सोमवारी ३ वा. ४० मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता असून ही पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. पण आकाराने ही उल्का छोटी आहे त्यामुळे नुकसानीची शक्यता नाही. ही उल्का ताशी २४०५० किमीच्या वेगाने जाईल.

तिसरी उल्का ४४१९८७ (२०१० एनवाय ६५) सुमारे १० वर्षांपूर्वी शोधली गेली आहे. ती २४ जून रोजी सकाळी ६ वा. ४४ मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. तिची लांबी ३१० मीटर असून तिचा वेग सर्वाधिक म्हणजे ताशी ४६४०० किमी असेल. या तिन्ही उल्कांवर वैज्ञानिक सतत लक्ष ठेऊन आहेत. पृथ्वीवर त्या कोसळण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment