कन्या टीफनी मुळे अडचणीत येणार डोनल्ड ट्रम्प

फोटो साभार जागरण

अश्वेत जॉर्ज फ्लोईड यांच्या हत्येमुळे अमेरिकेत उसळलेल्या हिंसाचाराची धग कमी होण्याचे नाव घेत नसताना आंदोलन कर्त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची कन्या टीफनी हिने पाठींबा दिल्याने ट्रम्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आंदोलन शमविण्यासाठी ट्रम्प सर्वतोपरी प्रयत्न करत असून वेळ पडल्यास सैन्य बोलावण्याची तयारी त्यांनी केली आहे.

अश्या परिस्थितीत टीफनी आंदोलकांना पाठींबा देत असल्याने आंदोलक खुश आहेत. केवळ टीफनीच नाही तर तिची आई आणि ट्रम्प यांची माजी पत्नी मार्ला हिनेही आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

ट्रम्प यांची कन्या इव्हंका नेहमीच चर्चेत असते आणि ती राजकारणात सक्रीयही आहे. ट्रम्प यांनी तीन विवाह केले आहेत. त्यातून त्यांना पाच मुले असून टीफनी ही ट्रम्प यांची दुसरी पत्नी मार्ला हिची मुलगी आहे. मार्ला अभिनेत्री आणि मॉडेल आहे आणि अमेरिकेत प्रसिद्ध आहे. तिने ट्रम्प यांच्या बरोबर १९९३ मध्ये विवाह केला होता मात्र सहा वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला होता.

टीफनी हिला वडिलांच्या उद्योगात अथवा राजकारणात रस नाही. तिने लॉ ची पदवी घेतली आहे. संगीताची आवड असलेली टीफनी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून इन्स्टाग्रामवर सतत फोटो शेअर करत असते. तिने वडील ट्रम्प यांच्या बरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. आता मात्र आंदोलकांच्या बाजूने उभी राहिल्याने ट्रम्प यांच्यासाठी अडचण निर्माण करू शकेल असे बोलले जात आहे.

Leave a Comment