वुहानने मागील काही दिवसात केल्या 1 कोटी टेस्ट्स, आता नवे गंभीर रुग्ण नाही

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आता वुहानमध्ये 19 दिवसांच्या कँपेन अंतर्गत जवळपास 1 कोटी लोकांची चाचणी करण्यात आली आहे. यातील केवळ 300 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत.  या 300 जणांच्या संपर्कात असलेल्या 1174 जणांना संसर्ग झाला नसल्याचे आढळले आहे. लक्षण नसलेल्या रुग्णांबाबत किती धोका आहे, याचे ठोस उत्तर नाही.

Image Credited – TOI

याबाबत चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे उपसंचालक फेंग झिजीन म्हणाले की, यामुळे वुहानमधील नागरिकांना केवळ दिलासाच मिळत नाही तर यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास देखील वाढतो. चीनमध्ये वुहान या शहराला व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला असून, देशातील 80 टक्के मृत्यू या शहरातील आहेत.

Image Credited – moneycontrol

शहराच्या प्रशासनाने सांगितले की, मे 14 ते 1 जून दरम्यान 9.9 मिलियन लोकांची चाचणी करण्यात आली. आधी चाचणी केलेल्यांचा समावेश केल्यास 5 वर्षांवरील जवळपास 1.1 कोटी लोकांची चाचणी आतापर्यंत करण्यात आली आहे. या चाचण्यांसाठी 125 मिलियन डॉलर खर्च आला. वुहान आता सुरक्षित असल्याचे अधिकारी म्हणाले.

नागरिकांचे रॅपिड टेस्टिंग करण्यात आले. यात 5 जणांचे नमुने एकत्र करून चाचणी करण्यात आली. जर याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रत्येकाची वेगवेगळी चाचणी केली गेली.

Leave a Comment