अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, अमेरिकेचा माफीनामा

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळला आहे. अमेरिकेत सर्वत्र निदर्शन सुरू असून, याचे लोण आता अमेरिकेतील भारतीय दुतावासापर्यंत पोहचले आहे. निदर्शन करणाऱ्यांमधील काही असामाजिक तत्वांकडून भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींच्या प्रतिमेला नुकसान पोहचवण्यात आले आहे. अमेरिकेच्या स्टेट्स पार्क पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून, या संदर्भात भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेची विटंबना झाल्याने माफी मागितली आहे.

केन जस्टर म्हणाले की, वॉशिंग्टन येथील महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या विंटबनेबाबत आम्ही माफी मागतो. आम्ही पूर्वग्रह आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाच्या विरोधात उभे आहोत. आपण यातून बाहेर पडू.

दरम्यान, 25 मे ला कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज प्लॉइडचा पोलिसांकडून मृत्यू झाला होता. पोलीस अधिकारी जॉर्ज यांच्या मानेवर गुडघा टेकून बसल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत हिंसाचार भडकला आहे.

Leave a Comment