जॉनी डेपने पोटगी म्हणून ऐंबर हर्डला दिली एवढी रक्कम ! - Majha Paper

जॉनी डेपने पोटगी म्हणून ऐंबर हर्डला दिली एवढी रक्कम !


बॉलीवूड अथवा हॉलीवूड म्हणा दोन्हीकडे घटस्फोट ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. त्यातच दोन्हीकडे अनेक घटस्फोट झाल्याच्या बातम्या आपल्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आल्या असतील. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या या व्यक्ती काही वर्षांनी एकमेकांचे तोंड देखील पाहण्यासाठी तयार नसतात. त्या यादीत आता हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि ऐंबर हर्ड यांच्या नावाचा समावेश झाला आहे. २०१५ मध्ये दोघांनी धुमधडाक्यात लग्न केले. त्यांचा संसार हा पण फक्त दोन वर्षातच मोडला आणि दोघांनी घटस्फोट घेतला. जॉनीने ऐंबरला पोटगी म्हणून भलीमोठी रक्कम देण्याचे कबूल केले आहे.

लग्नावेळी चाहत्यांना त्या दोघांची जोडी सर्वोत्तम वाटली होती. ही जोडी एकमेकांसाठीच बनल्याचे अनेकांनी म्हटले होते. पण त्यांच्या काही वर्षांनी घरगुती हिंसेच्या आणि एकमेकांना मारहाण केल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. ऐंबरने सुरुवातीला जॉनीवर मारहाण केल्याचा आरोप केला. पण नंतर ऐंबरही जॉनीला मारहाण करायची हे स्पष्ट झाले.

यासंदर्भात डेली मेलच्या रिपोर्टनुसार ऐंबरने ती घरातील आणि किचनचे सामान फेकून जॉनी डेपला मारायची, असे मान्य केले होते. यानंतर जॉनीचे काही फोटोही समोर आले होते ज्यात त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसत होते. या सगळ्यानंतर जॉनीने ऐंबरला ७० लाख डॉलर (भारतीय चलनात अंदाजे ५२ कोटी) पोटगी देण्याचे मान्य केले आहे. असे असले तरी ही सगळी रक्कम दान करणार असल्याचे ऐंबरने म्हटले आहे.

Leave a Comment