लडाखमध्ये चीनच्या वाढत्या हालचाली – सुरक्षा एजेंन्सीने सरकारला सोपवला रिपोर्ट

भारत-चीनमधील सीमावादाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षा एजेंन्सींनी सरकारला चीनच्या वाढत्या हालचालींबाबत सविस्तर रिपोर्ट दिला आहे. सुरक्षा एजेंन्सींनी चीन सैन्याच्या पुर्व लडाख भागातील  वाढत्या हालचाली आणि एवढे सैनिक त्या भागात कसे येत आहेत, याबाबतचा सविस्तर रिपोर्ट सरकारला सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये दौलत बेग ओल्डी सेक्टर आणि पॅनगाँग टिसो सेक्टर सारख्या महत्त्वाच्या भागातील चीनी सैन्याच्या हालचालींबाबत माहिती देण्यात आली आहे.

मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चीनने पुर्व लडाख भागात 5 हजार सैनिक तैनात केले होते. यानंतर भारताने देखील आपले सैनिक या भागात पाठवले होते. भारताच्या हद्दीत आलेल्या चीनी सैनिक भारतीय जवानांसोबत भिडल्याच्या घटना घडल्या आहेत. चीनी सैन्याला अधिक भारतीय सैन्याच्या हद्दीत यायचे होते, मात्र भारताने आपले सैनिक या भागात पाठवल्याने त्यांना ही संधी मिळाली नाही.

दरम्यान, भारत-चीनमध्ये लेफ्टिनेंट जनरल स्तरावर येत्या शनिवारी चर्चा होणार आहे. चर्चेद्वारे तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Comment