48MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच झाला सॅमसंगचा हा नवा स्मार्टफोन

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने फेब्रुवारीमध्ये लाँच केलेल्या गॅलेक्सी ए30 चे अपग्रेड व्हर्जन गॅलेक्सी ए31 भारतात लाँच केले आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले नॉच आणि रियर क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन तीन रंगात मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी ए31 च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. ग्राहक हा फोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश ब्लू आणि प्रिज्म क्रश व्हाइट रंगात खरेदी करू शकतात.

Image Credited – The Economic Times

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बीनॉऊ, सॅमसंग इंडिया ई-स्टोरसह ऑफलाईन स्टोर्समध्ये 4 जूनपासून फोनची विक्री सुरू झाली आहे. लाँच ऑफरमध्ये ग्राहकांना सॅमसंग फायनान्स, एनबीएफसीएस आणि बँकेंकडून ईएमआय ऑफर्स मिळतील.

Image Credited – Aajtak

सॅमसंग गॅलेक्सी ए31 ड्युल सिम सपोर्ट स्मार्टफोन अँड्राईड 10 वर आधारित वन यूआयवर चालतो. यात 6.4 इंच फूल एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) इनफिनिटी-U सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी65 प्रोसेसर मिळेल.

Image Credited – Smartprix

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात रियरला क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. याचा प्रायमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि इतर दोन 5-5 मेगापिक्सलचे कॅमेरे देण्यात आलेले आहेत. सेल्फीसाठी फ्रंटला 20 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Leave a Comment