लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले, लोक सत्य बोलण्यास घाबरतात – राजीव बजाज

कोरोना संकटाच्या काळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून विरोधी पक्ष सरकारला विविध मुद्यांवरून घेरत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी अर्थव्यवस्थे संदर्भात तज्ञांशी संवाद साधत आहेत. आता राहुल गांधी यांनी बजाज ऑटोचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी बोलताना दोघांनी कोरोनापासून अर्थव्यवस्था अशी विविध गोष्टींवर चर्चा केली.

राजीव बजाज म्हणाले की लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असून, लोकांमध्ये याबाबत भिती आहे. तर राहुल गांधी म्हणाले की जेव्हा स्थिती बिघडली तेव्हा केंद्राने राज्यांना स्वतःच्या स्थितीत सोडले. राहुल गांधी यांनी मजुरांविषयी विचारले असता बजाज म्हणाले की, भारताने पुर्वे ऐवजी पश्चिमेकडील देशांकडे पाहिले. मात्र पुर्वेकडील देशात व्हायरसविरोधात चांगले काम झाले आहे. या देशांनी तापमान, मेडिकलसह विविध अडचणींच्या बाबतीत चांगले काम केले. आपल्या येथे फॅक्ट आणि सत्यतेची कमी राहिली. लोकांना वाटते की हा आजार कॅन्सर सारखा आहे. लोकांचे विचार बदलून जीवन पुन्हा सामान्य करण्याची गरज आहे. मात्र याला वेळ लागेल.

बजाज म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी लॉकडाऊन अवघड आहे. भारतासारखा लॉकडाऊन कोठेच झाला नाही. आपल्या येथे कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला. कठोर लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती बिघडली. जगभरात सरकार सर्वसामान्यांची मदत करत आहे. मात्र भारतात सरकारकडून थेट सर्वसामान्यांच्या हातात पैसे देण्यात आलेले नाहीत.

अर्थव्यवस्था कशी वाढवावी असे राहुल गांधींनी विचारल्यावर बजाज म्हणाले की, भारताच्या उत्पादनावर जगाची नजर आहे. कंपन्यांनी स्पेशलिस्ट बनायला हवे. आपण विचारांनी मोकळे आहोत. भारताने विचारांचे मोकळेपण गमवू नये. ते म्हणाले की, आज देशातील 100 लोक बोलण्यास घाबरतात. 90 लोकांकडे लपवण्यासाठी काहीतरी आहे. काही लोक बोलायला घाबरतात, मात्र माझे वडील निडर होऊन बोलतात.

राहुल गांधी देखील सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, केंद्राने रेल्वे-विमानांवर काम करायला हवे होते. मुख्यमंत्री आणि डीएम यांनी जमिनीवर काम करायला हवे होते. माझ्या हिशोबाने लॉकडाऊन अपयशी ठरले असून, आता रुग्ण वाढत आहेत. आता सरकार मागे हटत आहे व राज्यांना स्थिती हाताळण्यास सांगत आहे.

Leave a Comment