सौदी अरेबिया, यूएईनंतर आता कतारने पाकिस्तानला दिला मोठा झटका

कोरोना व्हायरस महामारीसह आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला आणखी मोठा झटका बसला आहे. सौदी अरेबिया आणि यूएईनंतर कतारने पाकिस्तानच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. सुरूवातीला कतारने उत्सुकता दाखवली होती, मात्र कतारने आता नकार दिला आहे.

Image Credited – Aajtak

कतारने पाकिस्तानच्या सरकारशी इस्लामाबाद विमानतळ, जिन्ना आंतरराष्ट्रीय आणि अलामा इकबाल विमानतळाच्या मालकी हक्क हस्तांतरणाबाबत चर्चा केली होती. यासाठी कतार इनव्हेस्टमेंट अधिकाऱ्यांनी पाकिसानच्या मालकीच्या कंपनीची 40 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यास रस दाखवला होता. मात्र सरकारने विमानतळाच्या व्यावसायिक कामांना आउटसोर्स करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर कतारने गुंतवणुकीस नकार दिला.

पाकिस्तानला विमानतळाच्या पार्किंग सर्व्हिसेज, टेक शॉप सर्व्हिसेज, रेस्टोरेंट सारख्या सेवांना आउटसोर्स करायचे आहे. जेणेकरून विमानतळाचे ऑपरेशनल कंट्रोल स्वतःकडे राहिल. मात्र कतारने या कारणामुळे गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. मागील वर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कतारचा दौरा केला होता. त्यावेळी कतारच्या अमीरने पाकिस्तानच्या विमानतळात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कतारने पाकिस्तानमध्ये 3 अब्ज डॉलर गुंतवणुकीची घोषणा देखील केली होती.

सौदी अरेबिया आणि यूएई यांनी आधीच यात गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. आता पाकिस्तानने योजनेचे काम पुढे नेण्यासाठी आणि दुसऱ्या पर्यायांसाठी कमिटी स्थापन केली आहे.

Leave a Comment