टोयोटा ‘फॉर्च्यूनर’ आली या नव्या शानदार अवतारात

टोयोटाने आपली लोकप्रिय एसयूव्ही फॉर्च्यूनरचे नवीन मॉडेलवरील पडदा हटवला आहे. कंपनीने टोयोटा फॉर्च्यूनरला थायलंडमध्ये सादर केले आहे. फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. टोयोटो फॉर्च्यूनर फेसलिफ्टचा फ्रंट लूक नवीन आहे. यात एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससोबत रिडिजाइन्ड एलईडी हेडलाइट्स, मेश-पॅटर्न मोठे ग्रिल, वेगळ्या डिजाइनचे बंपर आणि नवीन डिजाइनचे 18-इंच एलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत. मागील बाजूला स्लिम लुक एलईडी टेल-लाइट्स देण्यात आले आहेत.

Image Credited – navbharattimes

टोयोटाने फॉर्च्यूनर लेजेंडर नावाने एसयूव्हीचे टॉप मॉडेल सादर केले आहे. यात स्टँडर्ड मॉडलपेक्षा वेगळे स्प्लिट ग्रिल, एलईडी टर्न इंडिकेटर्स सोबत वेगळे फ्रंट बंपर, यूनिक पॅटर्नचे एलईडी डीआरएलसोबत ड्यूअल एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स देण्यात आले आहे. नवीन फॉर्च्यूनरच्या स्टँडर्ड मॉडलमध्ये जेथे फ्रंटला क्रोम आहे, लेजेंडर मॉडेलमध्ये तेथे ग्लॉस ब्लॅक फिनिश आहे. या टॉप मॉडेलमध्ये 20-इंच एलॉय व्हिल्ज, ड्यूअल-टोन पेंट स्कीम, बूट-लिड व रियर बंपरवर ग्लॉस ब्लॅक एलिमेंट्स देण्यात आले आहे.

Image Credited – navbharattimes

जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन फॉर्च्यूनरच्या इंटेरियरमध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाही. कॅबिनमध्ये 8.0 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. एसयूव्हीमध्ये 8 प्रकारे पॉवर एजस्टेबल ड्राइव्हर आणि को-ड्राइव्हर सीट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग देण्यात आली आहे. याशिवाय एलईडी अँम्बिएंट लायटिंग, 9-स्पीकर JBL ऑडियो सिस्टम आणि 360 डिग्री कॅमरा सारखे फीचर आहेत. लेजेंडर व्हेरियंटमध्ये 9.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल.

Image Credited – navbharattimes

एसयूव्हीच्या इंजिनबद्दल सांगायचे तर यात 2.4-लीटर, 4-सिलिंडर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 150hp पॉवर आणि 400Nm टॉर्क जनरेट करते. यात 2.8 लीटर डिझेल इंजिन देखील मिळते. भारतात लाँच होणाऱ्या फॉर्च्यूनरमध्ये बीएस-6 मानक 2.7-लीटर पेट्रोल आणि अपग्रेडेड 2.8-डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. भारतात ही एसयूव्ही या वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा नवीन वर्षाच्या सुरूवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात असलेल्या या मॉडेलची किंमत 28.66 लाख ते 34.43 लाख रुपये आहे. नवीन फॉर्च्युरची किंमत या पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment