नेहरुंनी नाकारली नेपाळने भारतात विलिनीकरणाची दिलेली ऑफर : सुब्रमण्यम स्वामी


नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय जनता पक्षाकडून काश्मीर प्रश्न, भारताला संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सुरक्षा समितीचे सदस्यत्व नसणे यासह विविध मुद्द्यांवरुन जबाबदार धरले जाते. त्यातच आता एक नवा आरोप भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. भारतामध्ये समाविष्ट होण्याची ऑफर नेपाळने दिली होती. पण ती नेहरुंनी नाकारल्याचे स्वामींनी म्हटले आहे. स्वामींनी ट्विटद्वारे हा दावा सध्या नेपाळसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर केला.


सुब्रमण्यम स्वामी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ऐतिहासिक नोंदी पाहिल्या तर नेहरुंची आणखी एक चूक समोर येते. राणा जेव्हा नेपाळवर राज्य करायचे आणि भारतात नेपाळ रॉयल्टी होती, तेव्हा राणा इतर संस्थानिकांप्रमाणेच राज्यकर्त्यांनीही १९५० मध्ये भारतात समाविष्ट होण्याची ऑफर दिली होती. पण ही ऑफर नेहरुंनी नाकारली. एक अनुवंशिक दोष एकाच कुटुंबात चालतो, म्हणून कौटुंबिक नियम काढून टाका.

Leave a Comment