सलाम : दिव्यांग पतीला पाठीवर घेऊन या बहादुर महिलेने केला कानपूर ते महाराष्ट्र रेल्वेने प्रवास

कोरोना व्हायरस महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये परराज्यात अडकलेल्या कामगार आपल्या घरी जात आहेत. सरकारने या कामगारांसाठी बस आणि रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र असे असले तरी शेकडो कामगार पायीच आपल्या घरी जात आहे. घरी पोहचण्यासाठी हजारो किमी पायी, सायकलने जाणाऱ्या अनेक कामगारांचे फोटो सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत आहेत.  अशीच एक घटना कानपूरमधून समोर आली आहे.

Image Credited – Amarujala

कानपूरमध्ये एका महिलेच्या पतीची तब्येत खराब असल्याने तो चालू शकत नव्हता. अशा स्थितीमध्ये महिलेने पतीला खांद्यावर घेऊन प्रवास केला आहे. कानपूर सेंट्रल स्टेशनवर जेव्हा पतीला घेऊन जाण्यासाठी काहीही साधन न मिळाल्याने अखेर पत्नी धर्म निभावत महिला पतीला खांद्यावर घेऊन प्लॅटफॉर्मवर पोहचली.

Image Credited – Amarujala

हे दांपत्य मूळचे महाराष्ट्रातील जळगाव येथील आहेत. पतीचे नाव दीपक असून, ते एका वीज ठेकेदाराकडे काम करायचे. दीड महिन्यापुर्वी एका अपघातात त्यांचा पाय तुटल्याने ते चालू शकत नाहीत.

दीपक यांच्या पत्नीचे नाव ज्योती असून, दीपक चालू शकत नसल्याने ज्योती सर्व काम करतात. ज्योती आपल्या पाठीवर पतीला घेऊन बाहेर जातात. अखेर मंगळवारी दिव्यांग पतीला घेऊन ज्योती या पुष्पक एक्सप्रेसने मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत.

Leave a Comment