फेसबुक, इंस्टाग्रामने मागितली माफी, ‘#Sikh’ अनब्लॉक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्रामला आपल्या प्लॅटफॉर्मवर #Sikh आणि #Sikhism ब्लॉक केल्याने टीकेचा सामना करावा लागला आहे. मार्च महिन्यापासून युजर्सला हे दोन्ही हॅशटॅग वापरता येत नव्हते. जगभरात याबाबत कँपेन केल्यानंतर अखेर कंपनीने काल माफी मागत हे हॅशटॅग अनब्लॉक केले आहेत. कंपनीने याबाबत सांगितले की, त्यांना आताच शीख समुदायाच्या फिडबॅगनंतर हे हॅशटॅग वापरता येत नसल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर कंपनीने फेसुबक आणि इंस्टाग्राम या दोन्ही ठिकाणी हे हॅशटॅग अनब्लॉक केले.

अनेक युजर्सला ऑपरेशन ब्लू स्टार्सबाबत पोस्ट करायचे होते, त्यावेळी हे हॅशटॅग वापरता येत नसल्याचे समोर आले. शीख नेते, कलाकारांनी दोन्ही प्लॅटफॉर्मला टॅग करत हा भेदभाव असल्याचे म्हटले. यावरून अनेकांना टीका सुरू केल्यानंतर इंस्टाग्रामने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. इंस्टाग्रामने म्हटले की, हे हॅशटॅग कशाप्रकारे ब्लॉक झाले व कंपनीला याची माहिती मिळण्यास का विलंब झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोस्सेरी एका ट्विटला रिप्लाय देताना म्हणाले की, हे कशामुळे झाले माहिती नाही. मात्र आम्ही हे तपासत असून, हे हॅशटॅग लवकरच वापरता येतील. याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हे कशामुळे झाले याची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, युजर्सला 7 मार्चपासून हे हॅशटॅग वापरता येत नव्हते व आतापर्यंत या टेक कंपन्यांना याची माहिती नव्हती. अनेकांनी असे का घडले या संदर्भात कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

Leave a Comment