कामासाठी शहरात येण्याची गरज नाही, गावोगावी उद्योग उभारणार कंपन्या – उदय कोटक

कामाच्या शोधात हजारो लोक गावाकडून शहरात येत असतात. उद्योग-धंदे, कंपन्या शहरात अधिक असल्याने नोकरीच्या संधी देखील तेथे अधिक आहेत. मात्र आता ग्रामीण भागात देखील कंपन्या स्थापन होणार आहेत. भारतीय उद्योग परिसंघाचे (सीआयआय) नवीन अध्यक्ष उदय कोटक पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, आता ग्रामीण भागातून शहराकडे नाही तर शहरातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर होत आहे. एक प्रकारे हे ग्रामीण-शहरांचे रीबँलेंस आहे. आता त्यांना घराच्या आजुबाजूलाच रोजगार मिळेल व ते आपल्या कुटुंबासोबत राहू शकेल. त्यांना शहरातील झोपडपट्टी भागात राहण्यापासून सूटका मिळेल.

कोटक म्हणाले की, आता मोठ्या कंपन्या देखील गावांमध्ये फॅक्टरी सुरू करण्याचा गंभीरतेने विचार करत आहे. एक उद्योग संघटन म्हणून सीआयआय याला प्रोत्साहन देईल. सरकार मोठ्या प्रमाणात सुधारणा करत आहे व ग्रामीण भागात संरचना निर्माण होत असल्याने तेथे देखील काम करण्यास काहीही समस्या निर्माण होणार नाही. सध्या लाखो कुशल कामगारांचे शहरातून ग्रामीण भागात स्थलांतर झाले आहे. यामुळे गावांच्या आजुबाजूला कारखाने सुरू केल्यास लोकांना कुशल कामगार मिळतील. गरज पडल्यास त्यांना प्रशिक्षण देऊन काम करण्यायोग्य बनवता येईल.

ते म्हणाले की, वर्क फ्रॉम होम एक नवीन पद्धत आहे, जी पुढेही कामाला येईल. गावात देखील वर्क फ्रॉम होममध्ये अडचण येणार नाही. कारण गावागावापर्यंत ब्रॉडबँड पोहचले आहे.

Leave a Comment