टोळधाडीमुळे केवळ पाकिस्तानच नाहीतर भारतातील अनेक राज्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पाकिस्तानातून भारतात दाखल झालेल्या टोळने राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील पिकांना नुकसान पोहचवले आहे. एकीकडे या किटकांच्या हल्ल्याने शेतकरी चिंतेत असताना, पाकिस्तान सरकारने याद्वारे कमाईचा नवीन मार्ग शोधला आहे. सरकारने लोकांना आवाहन केले आहे की टोळ किटकांना पकडून त्यांना सोपवावे. ज्याचा वापर कोंबड्यांना दाणे म्हणून केला जाईल.
आता टोळ विका आणि पैसे कमवा – पाकिस्तान सरकारचा नवीन जुगाड

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, टोळ पकडण्यासाठी एक पायलट योजना देशभरात सुरू करण्याचा विचार आहे. यात शेतकऱ्यांना या किटकांच्या बदल्यात पैसे मिळतील. या योजनेमुळे देशातील गरीब भागातील शेतकऱ्यांची चांगली कमाई होईल. पकडण्यात आलेल्या किटकांचा पोल्ट्री फार्ममध्ये प्रोटीन युक्त चारा बनवले जाईल.

ही पायलट योजना पंजाब प्रांताच्या ओकरा येथे लागू करण्यात आली असून, येथे शेतकऱ्यांना 1 किलो टोळ किटकांसाठी 20 रुपये मिळत आहेत. दरम्यान, टोळधाडीमुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले असून, पुर्व आफ्रिका आणि दक्षिण आशियात देखील या किटकांना हजारो हेक्टर शेतीचे नुकसान केले आहे. एप्रिल महिन्यात या किटकांनी राजस्थानमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात यांनी पिकांना नुकसान पोहचवले.