अॅमेझॉनकडून वर्णभेद विरोधी लढ्याला 1 कोटी डॉलरची मदत


नवी दिल्ली – कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लायड या नागरिकाच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या जोरदार निदर्शने आणि आंदोलने होत आहेत. या प्रकरणानंतर वर्णभेद हा मुद्दा पुन्हा एकदा केवळ ऐरणीवरच आला नाही. तर, वर्णभेदाविरुद्ध लढाईही सुरु झाली आहे. दरम्यान, आता ऑनलाईन सेवा देणाऱ्या अॅमेझॉन कंपनीनेही या लढ्याचे समर्थन केले आहे. अॅमेझॉन कंपनीने बुधवारी सांगितले की, वर्णद्वेश विरुद्धच्या लढाईत कंपनीकडून 1 कोटी डॉलर एवढी मदत दिली जाईल. कृष्णवर्णीय आणि अफ्रिकी वंशीय अमेरिकी लोकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी आणि त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ही मदत वापरण्यात येईल.

दरम्यान, अॅमेझॉन कंपनीच्या ब्लॅक एम्प्लॉई नेटवर्कच्या (BEN) मदतीने निधी देण्यासाठी केली जाणारी संघटनांची निवड ही करण्यात आली आहे. वर्णभेदाविरुद्ध कायदेशीर लढा देणाऱ्या संस्थांचा बीईएनमध्ये समावेश आहे. या संस्था कृष्णवर्णीयांना शैक्षणिक आणि सामाजिक अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे. अर्बन लीग आणि यूएनसीएफ आणि इतर संस्थांना अॅमेझॉन कंपनीकडून देण्यात येणारा निधी संपूर्ण अमेरिकेत कृष्णवर्णीय समूहाच्या शिक्षण आणि न्याय हक्कांसाठी वापरण्यात येईल.

बीईएन अध्यक्षा एंजेलिना हॉवर्ड यांनी सांगितले की, कृष्णवर्णीय समूहासाठी काम करणाऱ्या संस्थांची निवड करण्यासाठी अॅमेझॉन नेतृत्व आणि बीईएन यांनी संयुक्तरित्या काम केले आहे. ज्या बिगरशासकीय आहेत. त्यामुळे त्यांना अर्थपूर्ण मदत केली जाईल. आम्ही स्थानिक पातळीवर समूहांची ओळख पटवून काम करण्यासाठीही काम करु. हॉवर्ड यांनी पुढे बोलताना सांगितले की, सध्याच्या दूर्दैवी घटनांपासून आपले कर्मचारी आणि वर्णभेद लढ्यात भरडल्या जाणाऱ्या लोकांना दूर ठेवण्याचा अॅमेझॉन प्रयत्न करेन.

Leave a Comment