भारतातील करोना विषाणू वेगळा

फोटो साभार एज मार्केट

देशात करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत चालली असतानाचा हैद्राबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युअर बायोलॉजी मधील वैद्यानिकांनी भारतात प्रसार झालेला करोनाचा विषाणू वेगळा असल्याचे म्हटले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत देशातील करोना संक्रमितांची संख्या २ लाख १६ हजारापेक्षा अधिक झाली आहे. हैद्राबादच्या संस्थेतील वैज्ञानिकांनी नव्या सार्स- कोव २ या विषाणूंचा पत्ता लावला असून हा वेगळाच विषाणू असल्याचे म्हटले आहे.

अर्थात दक्षिणेकडील राज्ये तामिळनाडू, तेलंगाना मध्ये हा विषाणू अधिक प्रमाणात आढळत असल्याचे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. या विषाणूला क्लेड ए ३ आय असे नाव दिले गेले असून त्याच्या ६४ जीन्सचा सिक्वेन्स तयार करण्यात आला आहे असेही समजते. हा विषाणू फेब्रुवारी २०२० मध्ये निर्माण झाला असावा आणि देशात पसरला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संस्थेचे संचालक राकेश मिश्रा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, तेलंगण, तामिळनाडू मध्ये ज्या चाचण्या केल्या गेल्या त्यात बहुतेक सँम्पल मध्ये क्लेड ३ आय सापडला आहे. दिल्लीमध्ये सापडत असलेल्या विषाणू आणि या विषाणू मध्ये समानता आहे. तसेच सिंगापूर, फिलीपिन्स मध्येही याच प्रकारचा विषाणू आहे. मात्र महाराष्ट्र, गुजरात या राज्यात सापडत असलेला विषाणू या प्रकारचा नाही. आगामी काळात अधिक सँम्पल घेऊन जीनोम सिक्वेन्स बनविला जाईल असेही ते म्हणाले.

Leave a Comment