मॉल मध्ये जाताय, ही आहे नवी नियमावली

फोटो साभार झी बिझिनेस

अनलॉक १.० मध्ये देशातील अनेक राज्यात मॉल्स, हॉटेल्स उघडली जाणार आहेत. मॉल मध्ये जाण्याची योजना आखत असणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची सूचना म्हणजे मॉल मध्ये जाण्यासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून त्याचे काटेखोर पालन बंधनकारक केले गेले आहे. केवल मास्कचा वापर हे मॉल मधील प्रवेशासाठी पुरेसे ठरणार नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

मॉल मध्ये ठराविक संख्येत ग्राहकांना प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी प्री बुकिंग करावे लागणार आहे. पार्किंग साठीची निम्मीच जागा वापरात राहणार आहे. करोनाचा धोका अद्यापही कायम असल्याने मॉल मालकांनी हे नियम बनविले आहेत. सोशल डीस्टन्सिंगचे पालन करणे सहज सोपे व्हावे आणि आर्थिक हित जपताना ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी या दृष्टीने ही नियमावली तयार केली गेली आहे.

शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने त्यांच्या सर्व सभासदांना ही नियमावली पाठविली आहे. मॉल मालक त्याप्रमाणे तयारी करू लागले आहेत. मॉल मध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीचे तापमान मोजले जाणार आहे. सरकत्या जिन्याचा वापर करताना तीन पायऱ्या सोडून एक व्यक्ती एका पायरीवर उभी राहू शकेल. शॉपिंग सेंटर मध्ये आयसोलेशन रूम असणे बंधनकारक आहे तसेच ठराविक काळानंतर सॅनीटायझेशन केले जाणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment