धोनी रमला सेंद्रीय शेतीत

फोटो साभार इंडिअन एक्सप्रेस

आयपीएल चेन्नई सुपरकिंग्सचा कप्तान आणि टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने लॉकडाऊनचा पुरेपूर उपयोग करून घेतला असल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाऊन काळात धोनीने त्याच्या फार्महाउसवर सेंद्रीय शेती करायला सुरवात केली होती त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता त्याच शेतात धोनी ट्रॅक्टर शिकत असल्याचे फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत. विविध प्रकारच्या बाईक्स आणि कार्स संग्रही असलेल्या धोनीने शेतासाठी हा ट्रॅक्टर विकत घेतला आणि कसा चालवायचा ते शिकून घेतल्याचे समजते.

धोनीच्या या फोटोना त्याच्या चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्यावर कॉमेंट केल्या आहेत. पैकी एकाने नवीन बीस्ट वर सवार थाला असे म्हटले आहे. दक्षिण भारतीय अवघड परिस्थितीशी दोन हात करून यशस्वी होणारयाला थाला म्हणजे राजा म्हणतात. अन्य एकाने माही ज्या फिल्ड मध्ये जाईल तेथे काहीतरी नवे करतो मग ते ऑन फिल्ड असो वा ऑफफिल्ड असे म्हटले आहे.

गेले वर्षभर धोनी क्रिकेट मैदानापासून दूर आहे.

Leave a Comment