श्रमिक रेल्वेमध्ये जागा न मिळाल्याने कामगाराने थेट कार खरेदी करत गाठले घर

लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांना घरी पोहचण्यासाठी केंद्र सरकारने स्पेशल श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र घरी जाण्यासाठी या रेल्वेत कामगारांची प्रचंड गर्दी होत आहे. अनेकांना लवकर तिकिटे देखील मिळत नाही. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे पेंटर म्हणून काम करणारे लल्लन यांना देखील आपल्या घरी गोरखपूरला जायचे होते. मात्र त्यांना तीन दिवस तिकिटेच मिळाली नाहीत.

Image Credited – storypick

तिकिटे न मिळाल्यामुळे अखेर चौथ्या दिवश लल्लन यांनी थेट बँकेचा रस्ता धरला व आपली आतापर्यंतची जमा-पुंजी असलेली 1.9 लाख रुपये खात्यातून काढले. या पैशांद्वारे त्यांनी सेंकड हँड कार खरेदी केली. त्यांनी 1.5 लाखांची जुनी कार खरेदी केली व आपल्या कुटुंबासह घरचा रस्ता धरला.

Image Credited – storypick

ते म्हणाले की, लॉकडाऊननंतर काही दिवसांनी सर्व सुरळीत होईल असे मला वाटत होते. लॉकडाऊन वाढत गेल्यानंतर सुरक्षेसाठी गावाला गेले पाहिजे असे वाटले. आम्ही अनेकदा बस आणि रेल्वेमध्ये सीट मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. श्रमिक ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने अखेर कार खरेदी करून घरी जाण्याचा निर्णय घेतला. मला माहिती आहे मी माझी सर्व बचत खर्च केली, मात्र माझे कुटुंब सुरक्षित आहे.

लल्लन आणि त्यांचे कुटुंब सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. जर गोरखपूरमध्ये काम मिळाल्यास पुन्हा गाझियाबादला परतणार नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Comment