अंधविश्वास ; कोरोनाला पळवून लावण्यासाठी या महिला करत आहेत पूजा

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला आहे. 100 पेक्षा अधिक देश या महामारीवर लस शोधत आहेत. मात्र आता काही लोक या आजाराबाबत अंधविश्वास पसरवत आहेत. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात याचाच एक प्रकार पाहण्यास मिळाला. येथे काही महिला कोरोना व्हायरसला पळवून लावण्यासाठी कथितरित्या ‘कोरोना मैया’ची (मां) पूजा करत आहेत. या महिलांचे म्हणणे आहे की पूजा केल्याने ‘कोरोना माता’ आपल्या घरी निघून जाईल व ज्यामुळे व्हायरस नष्ट होईल.

Image Credited – Aajtak

पूजा करणाऱ्या या महिलांनी सांगितले की, मोबाईलवर एक व्हिडीओ आला होता. ज्यात कथितरित्या ‘कोरोना मैया’ची पूजा करण्यास सांगितले होते. हा व्हिडीओ त्या भागात व्हायरल झाल्यानंतर महिलांनी पूजा-पाठ करण्यास सांगितले.

Image Credited – Aajtak

नोखा गावातील पुजा करणाऱ्या महिला पार्वती देवी म्हणाल्या की, त्यांना विश्वास आहे की असे केल्याने ‘कोरोना मैया’ आपल्या घरी जाईल. त्यामुळे त्या अगरबत्ती आणि फळ-फूल घेऊन पुजा करण्यासाठी पोहचल्या होत्या. चिंतेची बाब म्हणजे पूजा करताना या महिलांनी मास्क देखील लावले नव्हते व सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले नाही.

Leave a Comment