मोदींचा सुरक्षा ताफा होणार अभेद्य, आता आले ‘एअर इंडिया वन’, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेला अभेद्य करण्यासाठी खास सुपरजेट तयार करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेत एअर इंडिया वन हे सुपरजेट बनून तयार झाले आहे. याच महिन्यात हे सुपरजेट भारतात येऊ शकते. या सुपरजेटमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच सुरक्षेची उपाय देण्यात आले आहेत.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या प्रवासासाठी काही दिवसांपुर्वी एअर इंडियाच्या 2 नवीन बोईंग 777-300 विमानांना खरेदी केले होते. या विमानांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले आहेत. या विमानासाठी भारताने अमेरिकेसोबत 1300 कोटी रुपयांचा करार केला आहे. या अंतर्गत दोन सेल्फ प्रोटेक्शन सुट खरेदी करण्यात आले आहेत, जे एअर इंडिया वन विमानात लावले जातील.

Image Credited – Twitter

या सुपरजेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हे सुपरजेट पुर्णपणे मिसाईल डिफेंस सिस्टमने सुसज्ज आहे. यात खास सेंसर देण्यात आले असून, जे मिसाइल हल्ल्याची त्वरित सुचना देतात. यानंतर डिफेंसिव्ह इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टम सुरू होईल. या सिस्टममध्ये इंफ्रा रेड सिस्टम, डिजिटल रेडियो फ्रिक्वेंसी जॅमर देण्यात आले आहे. या सारख्या सुविधा अमेरिकेन राष्ट्रपतींच्या विमानात देण्यात आलेल्या आहेत. हे विमान ताशी 900 किमी वेगाने उड्डाण घेईल. लवकरच ही विमाने भारताला सुपूर्द केले जातील.

Leave a Comment