लॉकडाऊन; वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून कोट्यावधींची दंड वसूली

लॉकडाऊन दरम्यान राज्यभरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी राज्यभरात 1323 वाहन चालकांविरोधात कारवाई करत 76838 वाहने जप्त केली आहेत. 23641 लोकांविरोधात तक्रार दाखल करत त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी या काळात चालकांकडून तब्बल 6.11 कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

नवभारत टाईम्सनुसार, मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लॉकडाऊनमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून कमी कारवाई करत आहे. अनेकदा दोषींना केवळ चेतावणी देऊन सोडले जात आहे. मुंबई पोलिसांच्या सुत्रानुसार, कोरोनाच्या काळात अनेकदा त्वरित दंडाची रक्कम घेऊन वाहन चालकांना सोडण्यात आले. स्टेशन हाऊसमध्ये आधीच जागा कमी असल्याने अनेकदा चालकांकडून दंड वसूल करून वाहन सोडण्यात आले.

काही प्रकरणात प्रतिबंधित ठिकाणी जप्त वाहनांना न्यायालयाच्या आदेशावर सोडले जाते. यासाठी वाहनाच्या मालकाला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे जावे लागते. वाहन मालकांना वाहन सोडवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर त्याची एक कॉपी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्यानंतर वाहन सोपवले जाते.

Leave a Comment