कॉफी विथ करणने मला समजूतदार बनवले – हार्दिक पांड्या

भारतीय क्रिकेटपटू हार्दिंक पांड्या लवकरच बाबा होणार आहे. याबाबतची माहिती त्याने स्वतः इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. सध्या आपल्या कथित लग्नामुळे चर्चेत असलेला पांड्या याआधी देखील वादात सापडला आहे. टिव्ही शो कॉफी विथ करणमध्ये वादग्रस्त वक्तव्यामुळे पांड्याला टीकेचा सामना करावा लागला होता. सोबतच त्याला भारतीय क्रिकेट संघातून निलंबित देखील करण्यात आले होते. मात्र या घटनेने आपल्याला समजूदार बनवले असल्याचे पांड्याने म्हटले आहे.

क्रिकबझच्या कार्यक्रमात समालोचक हर्षा भोगलेंशी बोलताना पांड्या म्हणाला की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी स्वतःलाच बजावले की याचा स्विकार करून चूक सुधारण्याचा प्रयत्न करावा. जर मी स्वतःची चूक मान्य केली नसती तर ती गोष्ट माझ्यामध्ये अडकून राहिली असती. ती गोष्ट मला आता त्रासदायक वाटत नाही, कारण माझ्या कुटुंबानेही त्याचा स्विकार केला आहे.

जानेवारी 2019 मध्ये कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांबाबत आपत्तीजनक टिप्पणी केल्याने पांड्या आणि केएल राहुलला संघातून निलंबित करण्यात आले होते. या वादाचा कुटुंबावर कसा परिणाम झाला याविषयी बोलताना पांड्या म्हणाला की, मी कौटुंबिक माणुस आहे. कुटुंबाशिवाय मी काहीही नाही. माझे कुटुंबच माझा कणा आहे. ज्या हार्दिंक पांड्याला आता तुम्ही पाहता त्याचे मागे त्याची काळजी घेणारे लोक आहेत. ते मानसिकरित्या सक्षम आणि आनंदी राहिल याची ते काळजी घेत असतात.

हार्दिक म्हणाला की, माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आला. माझ्या वडिलांनी मुलाखत दिली होती, मात्र लोकांनी त्यांची देखील खिल्ली उडवली. सर्वात जास्त दुःख मला याचे होते की माझ्या कृत्यामुळे कुटुंबाला त्रास झाला व हे अस्विकार्य आहे.

Leave a Comment