टोळधाड रोखण्यासाठी केला देशी जुगाड, 2 कोटींपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ

टोळ किटकांनी उत्तर भारतात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अधिकारी शेतकऱ्यांना पिके वाचवण्याचा सल्ला देत आहेत. शेतकरी आपली पिके वाचविण्यासाठी ड्रम, भांडी वाजवतात आहेत. काहीजण तर शेतात थेट डीजे लावत आहेत. असाच एक टोळधाडीपासून वाचण्यासाठी एका शेतकऱ्याने देशी जुगाड केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक राहुल श्रीवास्तव यांनी ट्विटरवर एक टिक-टॉक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा देशी जुगाडाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, टोळ शोधाची जननी आहे.

@pinkipatel855♬ original sound – pinkipatel855

टिक-टॉकवर या व्हिडीओला 2 कोटींपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की शेतकऱ्याने आपल्या शेताच्या मध्यभागी विमानासारखे काहीतरी बसवले आहे. यात बाटली, पंखा आणि एका डब्ब्याचा वापर करण्यात आला आहे. हवेसोबत पंखा जोरजोरात चालू लागल्यानंतर डब्बा आपोआप वाजतो.

सोशल मीडियावर नेटकरी या देशी जुगाडचे कौतुक करत आहेत. अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment