जैशच्या बॉम्बमेकरसह 2 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून खात्मा

जम्मू-काश्मिरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या कारवाईत एक सुरक्षा दलाचा जवान देखील जखमी झाला आहे. खात्मा झालेल्या या दहशतवाद्यांमध्ये आयईडी बनवणारा अब्दुल रहमान उर्फ फौजी भाईचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वीच हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकूचा देखील एनकाउंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता.

काश्मिर भागाचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, रियाज नायकूनंतर लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांसाठी हे दुसरे सर्वात मोठे यश आहे. इतर दोन दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील आठवड्यात पुलवामामध्ये एका कारमध्ये आयईडी सापडले होते. हे आयईडी अब्दुल रहमानने बनवले होते.

कुमार म्हणाले की, अब्दुल रहमानचा खात्मा हा सैन्यासाठी मोठे यश आहे. तो पाकिस्तानी नागरिक होता व जैशसाठी बॉम्ब बनवण्याचे काम करत असे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच पुलवामामध्ये 40-45 किलोचे आयईडी घेऊन जाणाऱ्या एका कार चालकाला सुरक्षा दलाने रोखले होते. मागील वर्षी पुलवामा सारखा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा दलाने उधळून लावला होता.

Leave a Comment