काय आहे अँटिफा ? ज्याला ट्रम्प हिंसाचारासाठी ठरवत आहेत जबाबदार

जॉर्ज प्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांकडून मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार व्हाईट हाऊसपर्यंत पोहचल्यानंतर सिक्रेट सर्व्हिस एजेंट्सने राष्ट्रपती ट्रम्प यांना व्हाईट हाऊस अंतर्गत असलेल्या सुरक्षित बंकरमध्ये नेले. वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यूची देखील घोषणा करण्यात आली. ट्रम्प यांनी या हिंसाचारामागे डाव्या विचारांची संघटना अँटिफा असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणार असल्याचे म्हटले आहे.

Image Credited – aljazeera

काय आहे अँटिफा ?

अमेरिकेत फॅसिस्टला विरोध करणाऱ्या लोकांना अँटिफा म्हटले जाते. अमेरिकेत अँटिफा आंदोलन उग्रवादी, डावे व फॅसिस्टविरोधी चळवळीसाठी वापरले जाते. हे लोक विविध मुद्यांवरून सरकारचा विरोध करतात. या आंदोलनाशी संबंधित लोक निदर्शन, मोर्चा काढत असतात.

Image Credited – navbharattimes

संघटनेची स्थापना –

अँटिफाच्या स्थापनेसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती नाही. या संघटनेचे सदस्य दावा करतात की यूरोपियन फॅसिझमचा सामना करण्यासाठी  1920-30 च्या दशकात याची स्थापना करण्यात आली. तर अँटिफाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्यांनुसार याची सुरूवात 1980च्या दशकात अँटी-रेसिस्ट अ‍ॅक्शन नावाच्या संस्थेंसोबत झाली. 2000 पर्यंत अँटिफाचे नाव जास्त चर्चेत नव्हते. मात्र ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.

Image Credited – navbharattimes

या संघटनेचे सदस्य कोण ?

या संघटनेचा अधिकृत नेता देखील नाही व कोणताही सदस्य पोलीस कारवाईमुळे पुढे येत नाही. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे अवघड आहे.

अँटिफा कोणाच्या विरोधात ?

अँटिफाचे सदस्य नव-नाझी, फॅसिझम, श्वेत वर्चस्ववादी आणि वर्णभेदाचा विरोध करतात. याचे सदस्य उजव्या विचारधारेचा देखील विरोध करतात.

Leave a Comment