देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना, दुसरीकडे लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहेत. तामिळनाडूमध्ये 1 जूनपासून सलून आणि ब्यूटी पार्लर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र तामिळनाडूमध्ये केस कापण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
विना आधार कार्ड कापले जाणार नाही केस, या राज्याने दिले आदेश
तामिळनाडू सरकारने जारी केलेल्या सुचनेनुसार, केस कापायचे असतील तर आधार कार्ड दाखवणे गरजेचे आहे. सलून मालक प्रत्येक ग्राहकाचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि आधार नंबरची नोंद ठेवेल. जर त्यांनी असे केले नाहीतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय कोणत्याही सलूनमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक (8 पेक्षा अधिक नाही) कर्मचारी नसतील. सलूनमध्ये एसी सुरू नसेल, प्रत्येक ग्राहकाला मास्क लावणे अनिवार्य असेल व आधी हात सॅनिटायझ करावे लागेल. यानंतर ते आरोग्य सेतू अॅपमध्ये माहिती तपासतील.

सलून मालक ग्राहकांना डिस्पोजेबल एप्रन आणि बुटांसाठी कव्हर देईल. जर ग्राहकांचे बिल 1 हजार रुपये आल्यास, त्यांना 150 रुपये एप्रन आणि फूट कव्हरचे द्यावे लागतील. सलून मालकांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगण्यात आले असून, न्हावीला मास्क लावणे व साफ-सफाई करणे अनिवार्य असेल.