तीन लग्नांनंतर चौथ्या लग्नासाठी या अभिनेत्रीचे देवाला साकडे


सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसन चर्चेत असते. तिने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रावर निशाणा साधला होता. पण ती एका वेगळ्या कारणामुळे आता पुन्हा चर्चेत आली आहे. तिने चौथ्या लग्नाची इच्छा व्यक्त केल्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.


न्यूयॉर्क टाइम्स मॅगझीनला नुकतीच पामेलाने मुलाखत दिली. तिला या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. तिने तेव्हा चौथ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तीन वेळा माझे लग्न झाले आहे. पण अनेकांना असे वाटते की माझे पाच वेळा लग्न झाले आहे. असे का मला ते माहित नाही.


माझे लग्न टॉमी लीशी झाल्यानंतर मी बॉब रिचीशी लग्न केले. त्यानंतर रिक सॅलमनसोबत मी लग्न केले. माझी तीनच लग्न झाली आहेत. मला माहित आहेत तीन लग्न देखील खूप आहेत पण पाच पेक्षा तरी कमीच असल्याचे पामेला म्हणाली. त्यानंतर तिला पुन्हा लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तिने त्यावर का नाही? आता फक्त एकदाच. आता फक्त एकदा मला लग्न करायचे आहे देवा, असे उत्तर तिने दिले आहे.


१९९५ साली सर्वप्रथम पामेलाने अभिनेता टॉमी लीसोबत लग्न केले होते. पण त्याला तीन वर्षानंतर १९९८ साली तिने घटस्फोट दिल्यानंतर बॉब रिचीशी २००६ साली लग्न केले, २००७ साली तिने त्याला घटस्फोट दिला. त्यानंतर २००७ साली अमेरिकन पोकर खेळाडू रिक सॅलमनसोबत तिने लग्न केले, पण एकाच वर्षात त्यालाही तिने घटस्फोट दिला. आता तिने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Leave a Comment