हसीन जहाँने शेअर केलेल्या त्या फोटोला मोहम्मद शमीचे उत्तर


मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीचा त्याची पत्नी हसीन जहांसोबत वाद सुरु आहे. याचदरम्यान हसीन जहाँने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन मोहम्मद शमीवर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. त्यावर आता शमीने उत्तर दिले आहे. हसीनने केलेले सर्व आरोप निराधार आणि खोटे असून तिने केलेले आरोप सिद्ध करुन दाखवावेत, असे आव्हानच आता त्याने दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे सध्या मोहम्मद शमी गरजूंची मदत करत आहे. त्याने काल दुपारी बसमधून जाणाऱ्या स्थलांतरित मजूर आणि इतर प्रवाशांना स्वत:च जेवण आणि फळांचे वाटप केले. शमीने यावेळी पत्नी हसीन जहाँच्या आरोपांवरही भाष्य केले. तसेच आता माझा कोणताही संबंध हसीन जहाँसोबत नसल्याचा पुनरुच्चार मोहम्मद शमीने केला.

इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर करुन हसीन जहाँने सगळ्यांनाच धक्का दिला होता. तिच्यासोबत या फोटोमध्ये असलेला व्यक्ती हा मोहम्मद शमी असल्याचा दावा केला जात होता. पण ‘माझा पेपर’ याची पुष्टी करत नाही. शमीचे चाहते या फोटोवरुन हसीनवर भडकले आणि त्यांनी कमेंट करुन तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

या फोटोसोबत हसीनने शमीसाठी एक मेसेज देखील लिहिला होता. “कल तू कुछ नहीं था तो मैं पाक थी, आज तू कुछ बन गया तो मैं नापाक हो गई। झूठ बुर्खा डालकर बेपर्दा सच को मिटा नहीं सकता। मगरमच्छ के आंसू कुछ दिनों का ही सहारा होते हैं। ” यासह तिने ‘मॉडेल हसीन जहांसोबत क्रिकेटर शमी अहमद’, लिहिले होते.

Leave a Comment