कोरोना वॉरियर : यवतमाळच्या या 81 वर्षीय खैंरा बाबाजींनी दिले 20 लाख लोकांना मोफत जेवण

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन लागून दोन महिन्यांपेक्षा अधिक झाले आहे. आता सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येत आहे. या कठीण काळात लोक एकमेंकाची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. अशीच एक शीख व्यक्ती मागील दोन महिन्यांपासून गरजूंची मदत करत असून, त्यांनी आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक लोकांचे पोट भरले आहे. या व्यक्तीचे नाव बाबा कर्नेल सिंह  खैंरा आहे. ते 81 वर्षांचे आहेत.

महाराष्ट्रातील यवतमाळ येथील राष्ट्रीय महामार्ग 7 वर करंजी पार केल्यानंतर ‘गुरू का लंगर’ येते. येथे कर्नेल सिंह लोकांना मोफत जेवण देतात. या मार्गावर खाण्या-पिण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत नाही. अशा स्थितीमध्ये ते लोकांची मदत करतात. या हायवेवर 300 किमी पर्यंत एकही हॉटेल अथवा जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे येथून जाणारे ट्रक चालक आणि अन्य प्रवासी येथे जेवण करून पुढे जातात.

Image Credited – yourstory

कर्नेल सिंह यांनी सांगितले की, हा एक रिमोट एरिया आहे. आमच्यापासून मागे 150 किमी आणि पुढे 300 किमीवर एकही ढाबा अथवा रेस्टोरेंट नाही. त्यामुळे लोक येथे जेवण करून पुढच्या प्रवासाला निघतात. यामागे एक इतिहास देखील आहे. बागोर साहिब गुरुद्वारा तेथून 11 किमी आत जंगल भागात आहे. हा शीखांचा ऐतिहासिक गुरुद्वारा मानला जातो. 1705 मध्ये शीखांचे 10वे गुरू गोबिंद सिंहजी नांदेडला जाताना येथेच थांबले होते. कर्नल सिंह यांनी सांगितले की, बागोर साहिब गुरुद्वारा मुख्य रस्त्यापासून आत आहे. त्यामुळे 1988 ला महामार्गावर लंगरची ब्रँच सुरू करण्यात आली.

Image Credited – scoopwhoop

लॉकडाऊनच्या काळात देखील त्यांचा लंगर सुरूच होता. लोक येत असे व कर्नेल सिंह व त्यांची टीम त्यांना मोफत जेवण देत असे. या काळात अनेक लोकांनी जेवण बनवण्यापासून ते इतर कामात त्यांची मदत केली. त्यांची 17 जणांची टीम असून, त्यात 11 जण स्वयंपाकी आहेत.

कर्नेल सिंह यांचा भाऊ अमेरिकेला असतो. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी व त्यांच्या मित्रांनी देखील खूप मदत केली. येथे जेवणात डाळ, बटाट्याची भाजी, चपाती मिळते. याशिवाय चहासोबत बिस्किट, ब्रेड देखील मिळते. आंघोळीसाठी पाणी आणि साबणाची देखील सोय केली जाते. या भागातील प्राण्यांसाठी देखील जेवणाची सोय केली जाते. मागील 10 आठवड्यात 15 लाख लोकांना जेवण देण्यात आले. तर 5 लाख लोक पॅक करून घेऊन गेले.

Leave a Comment