गृहयुद्धाशी लढत असलेल्या अफगाणिस्तानबाबत संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे 6500 दहशतवादी युद्ध लढत आहेत. यात लश्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मदचे 1 हजार दहशतवादी आहेत. अमेरिका लवकरात लवकर अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. संयुक्त राष्ट्राच्या या रिपोर्टमुळे भारताची चिंता वाढली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की पाकिस्तानी दहशतवादी तालिबानसोबत मिळून अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिकन सैनिकांच्या विरोधात लढत आहेत.
अफगाणिस्तानात 6500 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय – संयुक्त राष्ट्र
अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांद्वारे संयुक्त राष्ट्राने म्हटले की तहरीक ए तालिबान पाकिस्तान, जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तैयबा या पाकिस्तानी गटांचा समावेश आहे, जे सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. जैश आणि लश्कर दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात घुसण्यास मदत करतात. हे लोक सल्लागार, प्रशिक्षक आणि आयईडी बनवण्यास मदत करतात.
हे दहशतवादी नानगरहार प्रांतात सक्रिय आहेत. पाकिस्तानचे 6000 ते 6500 दहशतवादी अफगाणिस्तानात सक्रिय असून, हे अंमली पदार्थांची तस्करी करतात व हेच तालिबानच्या कमाईचे मुख्य साधन आहे.