जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावरील औषध शोधण्यासाठी वैज्ञानिक दिवस-रात्र काम करत आहेत. आयुष मंत्रालयाने कोरोनापासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार सांगितले आहेत. आता ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी देखील यावर शिक्कामोर्तब केला आहे.
या घरगुती उपायाद्वारे कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका, ब्रिटनच्या संशोधकांचा दावा
ब्रिटनच्या एडिनबर्ग यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांना मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांसंदर्भात संशोधन केले आहे. संशोधकांनुसार मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने कोरोना संसर्गाचे लक्षण कमी होऊ शकतात. संशोधकांनी कोरोनाग्रस्त 66 रुग्णांवर 12 दिवस अभ्यास केला. या 66 रुग्णांना दररोज मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या लागल्या. 12 दिवसानंतर त्यांच्या संसर्गाचे लक्षण कमी झालेले आढळले.

जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केलेल्या रुग्णांमध्ये अडीच दिवसात संक्रमण कमी झाल्याचे आढळले. संशोधकांचे म्हणणे आहे की या उपायाद्वारे कोरोनाचा आजार कमी वेळेत बरा हाईल.
काही दिवसांपुर्वी आयुष मंत्रालयाने देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला होता. मंत्रालयाने देखील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या करून घसा साफ करण्यास सांगितले होते व घरगुती उपाय सुचवले होते.