जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरससाठी आतापर्यंत चीनला जबाबदार धरले जात आहे. मात्र आता फ्रान्सच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे की यूरोपमध्ये पहिला कोरोना व्हायरसचे प्रकरण जानेवारी नाही तर त्याही आधी दोन महिन्यांपुर्वी आले होते. मात्र तेव्हा डॉक्टर या आजाराला व लक्षणांना समजू शकले नव्हते. जर हा दावा सत्य निघाल्यास जगाचे लक्ष चीनवरून हटून फ्रान्सकडे जाईल.
चीन नाही तर फ्रान्समध्ये आढळला होता कोरोनाचा पहिला रुग्ण, वैज्ञानिकांचा दावा

फ्रान्सच्या वैज्ञानिकांचा दावा आहे की यूरोपमध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण 16 नोव्हेंबर 2019 ला कोलमार शहरात आढळले होते. या शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान फ्लूची तक्रार घेऊन 2500 लोक आले होते. डॉक्टरांनी या सर्वांचे एक्सरे रिपोर्ट तपासले व केवळ दोघांमध्येच कोरोना व्हायरसचे संक्रमण आढळले. मात्र त्यावेळी डॉक्टरांना या आजाराबाबत माहिती नसल्याने याची नोंद झाली नाही.
कोलमारच्या अल्बर्ट श्वित्जर हॉस्पिटलचे वैज्ञानिक डॉ. मायकल श्मिट आणि त्यांच्या टीमने दावा केला आहे की, आतापर्यंत ज्यांना यूरोपियन देशात केस झिरो म्हटले जात आहे ते दावे चुकीचे असू शकतात. चीनमध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण न आल्याची शक्यता आहे. कारण हा संसर्ग नोव्हेंबरमध्ये यूरोपमध्ये आला होता. मात्र फ्रान्सने आपल्या पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद 24 जानेवारी 2020 ला केली आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या उत्पत्तीसाठी चीनच्या वुहान शहराला जबाबदार मानले जात आहे. चीन सरकारने 31 डिसेंबर 2019 ला जगाला याबाबत माहिती दिली होती. डॉ. श्मिट यांच्यानुसार, सर्वात पहिल्या रुग्णाची माहिती मिळाल्याने या आजाराचा अभ्यास करता येईल व लस बनवण्यास मदत होईल.