वर्णभेद प्रकरणात तटस्थ राहिल्यामुळे मार्क झुकरबर्गवर फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनीच साधला निशाणा

अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. मात्र फेसबुककडून त्यांच्या या वक्तव्याविषयी तटस्थ भूमिका घेतल्याने आता कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच सीईओ मार्क झुकरबर्गवरच निशाणा साधला आहे. फेसबुकचे कर्मचारी ट्विटर प्रतिस्पर्धी कंपनीचे कौतुक करत आहेत व मार्क झुकरबर्गवर निशाणा साधत आहेत.

मागील काही वर्षात फेसबुक, अल्फाबेट गुगल आणि अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी सोशल जस्टिसच्या मुद्याचा आग्रह धरला आहे. मालकांना कारवाई करणे आणि धोरण बदलण्याचा आग्रह केला आहे. फेसबुकमध्ये उच्चपदावर कार्यरत असणाऱ्या जवळपास 3 कर्मचाऱ्यांनी ट्विटरवर मार्क झुकरबर्गच्या धोरणांवर टीका केली आहे.

फेसबुक न्यूज फीडच्या प्रोडक्ट डिझाईन डायरेक्टर रायन फ्रेटास यांनी ट्विटरवर लिहिले की, मार्क झुकीचे आहेत व मी त्यांचे मन बदलण्यासाठी जेवढे शक्य असेल तेवढा प्रयत्न करेल. तर दुसरे अधिकारी जेसन टॉफ असून, ते फेसबुकमध्ये प्रोडक्ट मॅनेजमेंटचे डायरेक्टर आहेत. त्यांनी लिहिले की, मी फेसबुकसाठी काम करतो व आम्ही ज्या प्रमाणे गोष्टींना बघत आहोत त्याचा मला गर्व नाही. अधिकांश कर्मचाऱ्यांना देखील असेच वाटते. आम्ही आमचा आवाज उंचावत आहोत.

फेसबुक प्रवक्ते अँडी स्टोन यांनी लिहिले की आम्ही पाहू शकतो की आमचे काही लोक दुःखी आहेत. खासकरून कृष्णवर्णीय समुदाय. नेतृत्वाशी सहमत नसल्यास आम्ही कर्मचाऱ्यांना मोकळेपणाने बोलण्याचे प्रोत्साहन देतो. अनेक फेसबुक कर्मचाऱ्यांनी थेट ट्विटरच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी प्रदर्शनावर ट्विट केले होते की, जर लुटालूट करण्यास सुरूवात झाली तर गोळीबार सुरू होईल. या ट्विटला ट्विटरकडून वॉर्निंग लेबल लावण्यात आले होते. मात्र या संदर्भात फेसबुकने काहीही कारवाई केली नव्हती.

Leave a Comment