लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. सिक्युरिटी फर्म बाराकुडा नेटवर्कनुसार 1 मार्च ते 23 मार्च दरम्यान 4,67,825 फिशिंग ईमेल पाठवण्यात आले असून, यातील 9,116 कोरोनाशी संबंधित आहेत. फेब्रुवारीमध्ये असे 1,188 आणि जानेवारी महिन्यात 137 ईमेल पाठवण्यात आले होते. कोरोना व्हायरस संबंधित ईमेल पाठवून खाजगी माहिती चोरी केली जात आहे.
लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ, असे रहा ऑनलाईन सुरक्षित
लॉकडाउन पीरियड में साइबर अपराध बढ़ गए हैं। पहले पांच महीने में पिछले साल के मुकाबले 10 प्रतिशत साइबर अपराधों में बढ़ोतरी हुई है। ज्यादातर मामले सोशल मीडिया अकाउंट हैक करने और मानहानि के लिए भेजे मैसेज से जुड़े हैं: सीनियर पुलिस इंस्पेक्टर जयराम पायगुडे, पुणे pic.twitter.com/z0cntVGIFt
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2020
पुण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जयराम पायगुडे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हे वाढले आहेत. मागील 5 महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी सायबर गुन्हे वाढले आहेत. अधिकांश प्रकरण सोशल मीडिया अकाउंट हॅक करणे व मानहानी संदर्भात आहेत.
सोशल मीडिया अकाउंट हँक –
हँकर्स मोबाईल नंबरद्वारे उघडण्यात आलेल्या फेसबुक अकाउंटची यादी बनवतात. कारण बहुतांश लोकांच्या अकाउंटचा पासवर्ड देखील तोच असतो. मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग इन करून हॅकर्स युजर्सच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना पैसे मागतात. युजर्सच्या नावाखाली अपघात, उपचारासाठी पैसे हवे असल्याचे कारण सांगतात.

स्कॅन ईमेलद्वारे मोफत मास्क, मोफत सॅनिटायझर देण्यात येत असल्याचे ईमेल पाठवले जातात. लस बनवणऱ्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी बनावट ईमेल पाठवून फसवणूक केले जाते. लोकांकडून बनावट डोनेशनचे देखील मागणी केली जाते. कोरोना व्हायरसच्या नावाखाली एक अटॅच फाईल युजर्सला पाठवली जाते. ही फाईल डाऊनलोड केल्याने सिस्टम हॅक होण्याची शक्यता असते. या प्रकारे डिव्हाईसमध्ये मॅलवेअर इंस्टॉल झाल्याने गोपनीय माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते.
अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी जीमेल आणि सोशल मीडिया अकाउंट्वर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करावे. यामुळे लॉग इन करताना प्रत्येक वेळी नॉटिफिकेशन मिळेल. याशिवाय कोरोना व्हायरस संबंधी कोणत्याही बनावट ईमेलवर क्लिक करू नका. बनावट ईमेल वाटल्यास त्वरित ब्लॉक अथवा स्पॅम मार्क करा.