या स्टडीने सांगितले कोणता मास्क कोरोनावर सर्वात प्रभावी

कोरोना व्हायरस आणि मास्कसंबंधी करण्यात आलेल्या 172 अभ्यासांमध्ये काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रोजेक्टला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निधी दिला होता. या अभ्यासाचे विश्लेषण केल्यावर समोर आले की एन95 मास्क हा इतर कपड्याच्या आणि सर्जिकल मास्कपेक्षा कोरोनाशी लढण्यात सर्वात फायदेशीर ठरतो. या अभ्यासाचे विश्लेषण लँसेट मॅग्झिनमध्ये प्रकाशित झाले असून, तज्ञांचे म्हणणे आहे की अत्यावश्यक सेवा, डॉक्टर आणि नर्स यांनी सर्जिकल मास्कच्या ऐवजी एन95 मास्क वापरण्याची डब्ल्यूएचओने शिफारस करावी.

Image Credited – Aajtak

जॉर्ज वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटीचे प्रा. डेव्हिज मायकल्स म्हणाले की डब्ल्यूएचओ आणि सीडीसी सर्जिकल मास्क पर्याप्त असल्याचे सांगतात मात्र असे नाही आहे. अनेक देशांमध्ये एन95 मास्कचा तुटवडा जाणवू लागल्याने लोकांना साधारण मास्क वापरण्यास सांगितले जात आहे.

Image Credited – NPR

मायकल्स म्हणाले की सर्जिकल मास्क वापरल्याने अनेक कर्मचारी संक्रमित झाले. विश्लेषणात समोर आले की एन95 मास्क 96 टक्के कोरोनापासून बचाव करतो. तर सर्जिकल मास्क केवळ 77 टक्के बचाव करतो.

Image Credited – MSN

केवळ आरोग्य कर्मचारीच नाहीतर अधिक धोका असलेल्या भागात काम करणारे लोक, मीट पॅकेजिंग करणारे कर्मचारी, फार्ममध्ये काम करणारे कर्मचारी यांनी देखील एन95 मास्क वापरावे असे मायकल्स म्हणाले.

Leave a Comment