कोरोनानंतर नवीन संकट, या देशात झाला आहे रक्त पिणाऱ्या किड्यांचा उपद्रव

कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या रशियाच्या एक भागात रक्त पिणाऱ्या किड्यांना हल्ला केला आहे. हे किडे चावल्याने लोक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात आहेत. मात्र त्यांना औषधांची कमतरता भासत आहे. रशियाच्या सरकारी आकडेवारीनुसार हे किडे सामान्य पेक्षा 428 पट अधिक मोठे आहेत. रशियाच्या सायबेरिया भागात या किड्यांचे प्रमाण वाढले आहे. हे किड्या छोट्या कोळी सारखे दिसतात. मात्र हे म्यूटेंट झाले असल्याने यांचा धोका अधिक आहे.

Image Credited – Aajtak

सायबेरियाच्या हॉस्पिटलमध्ये हे किडे चावल्याने एवढे रुग्ण आले आहेत की त्यांच्यासाठी औषधे कमी पडत आहेत. या किड्यांच्या प्रजातीमुळे रशियात 2015 मध्ये इंसेफेलाइटिस पसरला होता. यामुळे जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला होता. किड्यांमुळेच या भागात लाइम आजार पसरला होता.

Image Credited – Aajtak

कोरोना व्हायरसमुळे हॉस्पिटलची व्यवस्था बदलली असल्याने या रुग्णांना समस्या येत आहे. मध्य रशियाच्या क्रास्नोयार्स्कमध्ये किडे चावल्याचे 8215 रुग्ण समोर आले आहेत. यात 2125 लहान मुले आहेत. हे किडे लाइम डिजीज, इंसेफेलाइटिसद्वारे मेंदू, मज्जासंस्था, ह्रदय आणि नर्व्हस सिस्टमवर हल्ला करतात. हे किडे टाइगा टिक आणि फास इस्टर्न टिकचे मिश्रण आहे.

Leave a Comment