नवीन फोन घ्यायचा आहे ? हे आहेत चीनी स्मार्टफोन्सला काही खास पर्याय

कोरोना व्हायरसमुळे चीनवर जगभरातून टीका होत आहे. यातच सीमावादावरून देखील भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभुमीवर भारतीय युजर्स मोबाईल मधून चीनी अ‍ॅप डिलीट करण्याची आणि चीनी स्मार्टफोन न वापरण्याची मागणी करत आहेत. भारतीय युजर्स चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. स्मार्टफोनचा विचार केल्यास भारतीय बाजारात चीनी स्मार्टफोन कंपन्यांचे वर्चस्व आहे.

Image Credited – zdnet

शाओमी, मोटोरोला, रियलमी, वनप्लस, ओप्पो, व्हिवो आणि ह्युवाई सारखे ब्रँड चायनीज आहेत. नोकियाची विक्री देखील एचएमडी ग्लोबलद्वारे होतो, ज्याचा मोठा हिस्सा चीनी कंपनी फॉक्सकॉनकडे आहे. मात्र जर तुमची चीनी स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा नसल्यास तुम्ही दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग, एलजी, तायवानची आसुस, अमेरिकेची अ‍ॅपल आणि जापानची पॅनोसॉनिक कंपनीचे फोन खरेदी करू शकता.

Image Credited – zdnet

10 हजारांपेक्षा कमी किंमतीत जर तुम्ही चीनी स्मार्टफोन वगळता मोबाईल शोधत असाल तर सॅमसंग गॅलेक्सी एम10एस, गॅलेक्सी ए10एस, एलजी डब्ल्यू30 आणि पॅनोसॉनिक इल्युगा रे610 फोन खरेदी करू शकता. 10 ते 20 हजार रुपयांमध्ये तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एम31, गॅलेक्सी एम31एस, एलजी डब्ल्यू30 प्रो हे स्मार्टफोन खरेदी करता येतील.

Image Credited – zdnet

40 हजारांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी नोट10 लाईट, गॅलेक्सी एस10 लाईट, आसुस 6झेड, आसुस रोग फोन 2, गुगल पिक्सल 3ए आणि आयफोन 8 सीरिजमधील फोन खरेदी करू शकता. 40 हजारांपेक्षा अधिक किंमतीत तुमच्याकडे गॅलेक्सी एस20 सीरिज, एलजी जी8एक्स थीनक्यू, गुगल पिक्सल 3 एक्सएल आणि आयफोन 11 सीरिज हे पर्याय आहेत.

Leave a Comment