टीक-टॉकला टक्कर देणाऱ्या ‘मित्रों’ अ‍ॅपला गुगलने प्ले स्टोरवरून हटवले

टीक-टॉकला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कथित भारतीय अ‍ॅप मित्रोंला गुगलने प्ले स्टोरवरून हटवले आहे. मागील काही दिवसांपासून हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात आले होते. हे अ‍ॅप भारतीय नसून पाकिस्तानी डेव्हलपरने तयार केल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. अ‍ॅपच्या क्रिएटर्सने सांगितले होते की ते आपली ओळख जारी करणार नाहीत.

रिपोर्टनुसार, गुगलने या अ‍ॅपला स्पॅम आणि मिनिमम फंक्शनॅलिटी पॉलिसीचे उल्लंघन केल्या प्ले स्टोरमधून हटवले आहे. गुगलच्या पॉलिसीमध्ये म्हटले आहे की दुसऱ्या अ‍ॅपच्या कॉन्टॅक्टमध्ये बदल न करता अथवा काही समावेश न करता अपलोड करणे पॉलिसीच्या विरोधात आहे. थोडक्यात याच्या कोडमध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाहीत.  गुगलने आता मित्रों अ‍ॅपला रेड प्लॅग्ड आणि सस्पेंड केले आहे.

मित्रों अ‍ॅप टीकटॉकला टक्कर देईल असे वाटत होते. महिन्या भरातच 50 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले होते. मात्र पाकिस्तानी कंपनी Qboxus चे सीईओ इरफान शेख यांनी हे अ‍ॅप त्यांच्या कंपनीने तयार केले असून, अगदी कमी किंमतीत त्यांनी दुसऱ्या डेव्हलपरला हे अ‍ॅप विकले असल्याचा दावा केला आहे. याशिवाय या अ‍ॅपमध्ये अनेक बग होते.

दरम्यान, गुगलने मित्रों अ‍ॅपला प्ले स्टोरवरून हटवले असले तरीही प्ले स्टोरवर या सारखे डुप्लिकेट अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात आहेत. या मध्ये टूल्स एलएलसीचे मित्रों इंडियन, व्ही डेव्हलपरचे मित्रों – इंडियास शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म आणि सोशयलीचे मित्रों या अ‍ॅप्सचा समावेश आहे. भारतीय अ‍ॅप असल्याने यांना देखील चांगले रेटिंग्स मिळाले आहेत.

Leave a Comment