वाजिद खानची आई कोरोनाबाधित


बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार व गायक वाजिद खान यांचे कालच निधन झाल्यानंतर त्याची आई रझिना यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून सोमवारी मुंबईतील रुग्णालयात वाजिद खान यांचे हृदयगती थांबल्यामुळे निधन झाले होते. वाजिद यांची आई रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे.

यासंदर्भातील वृत ‘एबीपी न्यूज’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, वाजिदच्या आधीच त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. किडनीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केलेल्या वाजिद यांचा कोरोना रिपोर्ट नंतर पॉझिटिव्ह आला होता. रझिना यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर येत आहे. वाजिदचे कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाल्याची माहिती भाभ साजिद खान याने पीटीआयशी बोलताना दिली. त्याचबरोबर त्याचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे त्याने सांगितले. सोमवारी दुपारी वाजिद खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्काराला लॉकडाउन आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फक्त २० जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांच्या सुरक्षेत आणि निवडक कुटुंबियांच्या उपस्थितीत वाजिदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाजिद खानच्या निधनावर कलाविश्वातून शोक व्यक्त करण्यात आला. अमिताभ बच्चन, सलमान खान, कतरिना कैफ, अक्षय कुमार, सोनम कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment